छोटी सी कहानी से
छोटीसी कहानी से ... वरवर अॅकाॅर्डीयन आणि बास गिटारसाठी हवंहवंसं वाटणारं हे गाणं प्रत्येकवेळी नवीनच काहीतरी सांगून जातं ! शांत, गंभीर गाण्यांतही पंचमदांनी इलेक्ट्राॅनीक रिदमचा उपयोग - फक्त काही मात्रांसाठी - फार खुबीनं केलाय ... हे त्याचंच एक मस्त उदाहरण. मादल /डुग्गीबरोबरचं हे काॅम्बीनेशन इतकं जमून आलंय की ते कृत्रीम राहतच नाही ... उंचावरून खाली येणार्या जलप्रपातांप्रमाणंच तार सप्तकातून मंद्र सप्तकाकडं झेपावणार्या व्हायोलीन्स आणि बासरीच्या स्वरांनी सुरवात होते आणि अॅकाॅर्डीयनची मुख्य धून आपल्याला आशाजींपर्यंत नेते .. मुख्य आवाजाच्या मागं ऐकू येणार्या आशाजींच्याच लकेरी, आणि त्याच्याही मागं वाजणारे बासरीचे थरथरणारे स्वर ... मनातले कल्लोळ म्हणजे आणखी काय? पानी में आॅंसू थे, मिलके पराये थे अशा नाट्यमय ठिकाणापुरताच कोमल ग ऐवजी शुद्ध ग चा केलेला थरारक वापर ... दुसर्या आणि तिसर्या कडव्याच्या आधीच्या संगीतात एकाच वेळी दोन -तीन थरात वाजणारे व्हायोलीन्सचे ताफे ... तिसर्या कडव्याच्या आधी, पंचमच्या पार्श्वभूमीची आठवण देणारी बासरीवरची टिपीकल उत्तर-पूर्व भारतीय लकेर ... *फांद...